स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव गट) समोर मोठे आव्हान!

0
27

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे शिवसेना (उद्धव ठाकरे गट)समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षातील अनेक नेते व कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात सामील होत असल्याने उद्धव ठाकरे यांची संघटनात्मक ताकद कमकुवत होत आहे.

बंड्या साळवींसारख्या स्थानिक प्रभावी नेत्यांच्या शिंदे गट प्रवेशामुळे रत्नागिरीत उद्धव गटाला मोठा धक्का बसला आहे. विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडण्याचे आव्हान उभे असताना, पक्षातील गळती थांबवणे आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, हे उद्धव ठाकरे गटासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदारांना पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला नवे रणनीती आखावी लागणार आहे. शिवसेनेची पारंपरिक मते टिकवण्यासाठी प्रभावी प्रचार यंत्रणा, स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका आणि पक्षातील एकता महत्त्वाची ठरेल.

दरम्यान, शिंदे गट आणि भाजपसह अन्य राजकीय पक्षांनीही आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत उद्धव गटाला कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून, जनतेमध्ये आपली ताकद सिद्ध करावी लागणार आहे. आगामी निवडणुकीत कोणता गट मजबूत राहील आणि मतदार कुणाच्या बाजूने कौल देईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here