रत्नागिरी:- रत्नागिरीतील युवा उद्योजक मुस्तकीफ साखरकर यांचे नवीन युनानी हेल्थकेअर अँड हिजामा सेंटर आज पासून रत्नागिरीकर यांच्या सेवेत दाखल झाले झाले आहे . आज दिनांक २९/१२/२०२४ रोजी नवकार प्लाझा, मारुती मंदिर रत्नागिरी येथे ॲड.महेंद्र मांडवकर (जिल्हाध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था , रत्नागिरी), मुफ्ती.तौकीफ मन्सूर सारंग (डायरेक्टर- मदरसा- तुस -सुप्फा, सेक्रेटरी जमियत उलमा, रत्नागिरी) यांच्या हस्ते मुस्तकीफ साखरकर यांच्या नवीन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
मुस्तकीफ साखरकर हा साखरकर फर्निचरचा सर्वेसर्वा, अल्प कालावधीत ग्राहकांच्या पसंतीस आलेले हे साखरकर फर्निचर , फर्निचर व्यवसायातील यशानंतर साखरकर परिवारातर्फ रत्नागिरीकरांच्या सेवेसाठी युनानी हेल्थकेअर अँड हिजामा सेंटर उघडण्यात आले आहे. अगदी माफक दरात सेवा उपलब्ध केल्या आहेत.

या शुभारंभ प्रसंगी ॲड. महेंद्र मांडवकर (जिल्हाध्यक्ष, जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था, रत्नागिरी),मुफ्ती.तौकीफ मन्सूर सारंग (डायरेक्टर- मदरसा- तुस -सुप्फा, सेक्रेटरी जमियत उलमा, रत्नागिरी), डॉक्टर शेख इंतेखाब आलम (युनानी फिजिशियन अँड फाउंडर अँडव्हान्स पाकीजा युनानी,पुणे), मौ. इलियास बगदादी (डायरेक्टर-जमिया उमुल कुरा कोकण), श्री. सोहेल मुकादम (समाजसेवक), श्री.मुसा काझी(समाजसेवक), श्री.मुन्ना देसाई (समाजसेवक), श्री.जकी खान(समाजसेवक), श्री. मन्सूर काजी (जॉईंट सेक्रेटरी, पावस एज्युकेशन सोसायटी पावस), श्री. अकिल नाईक (संस्थापक-मुस्लिम वेल्फेअर सोसायटी (आंतरराष्ट्रीय), श्री. दिलीप देवळेकर (जिल्हाध्यक्ष- शिक्षक सेना), श्री. राहीद सोलकर (ब्लॉगर/यूट्यूब इन्फ्लुअन्सर), श्री. हिदायत नाईक (जिल्हाध्यक्ष-अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ), श्री.फैयाज मुकादम (सरपंच-मजगाव, समाजसेवक), श्री. साईराज चव्हाण (जिल्हाध्यक्ष- लोक अँड फिल्म टेलिव्हिजन, रत्नागिरी), श्री.किरण बोरसुतकर (डान्स कोरिओग्राफर किरण डान्स अकॅडमी), सौ.योगिता भाटकर (व्यवस्थापक, CMRC -रत्नागिरी) आदी मान्यवर उपस्थित होते.