पावस (रत्नागिरी):- रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय झडपोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. श्री. निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून आणि सचिव श्री. केदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखली हा शिबीर रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे आयोजित करण्यात आले. शिबीराला लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
“रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या तत्त्वावर आधारित शिबीराने पावस येथील स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवला. जिल्हाध्यक्ष अँड महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर आणि तालुकाध्यक्ष श्री मंदार नैकर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिबीर यशस्वीपणे पार पडले.