पावस (रत्नागिरी):- आज दि. २५ डिसेंबर २०२४ रोजी अनुसया आनंदी आश्रम, पावसचा २९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांनी वृद्धाश्रमाला सदिच्छा भेट दिली. वृद्ध महिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, सचिव केदार चव्हाण, ठाणे जिल्हाप्रमुख परेश कारंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पावसकर, प्रसिद्ध आंबा व्यावसायिक चंद्रशेखर (बंटी) महाकाळ, ग्रामपंचायत दोर्लेचे सरपंच प्रा. सचिन गिजबिले, आनंदी आश्रमाच्या विश्वस्त सरिता देसाई, सचिव ॲड. अकल्पिता चक्रदेव, सौ. फडके आणि जिजाऊ संस्थेचे सदस्य सिद्धेश चींदाने, साईराज कोलते, शुभम गोताड, साहिल रेवाळे, साहिल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.