रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल्स तसेच अन्नप्रक्रिया उद्योगांच्या स्वच्छता व दर्जा तपासणी बाबत अधिक सुसूत्रता आणण्यासंदर्भात डॉ. ज. शं. केळकर मेमोरियल फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. ऋषिकेश केळकर यांनी जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री. दीनानाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेत सविस्तर चर्चा केली. त्यावेळी संस्थेचे मीडिया समन्वयक/सल्लागार ऋषिकेश सावंत , बांधकाम व्यवसायिक श्रेयस सावंतदेसाई,राहुल आमरे आदी उपस्थित होते.