आयटीआय संगमेश्वर मधील विद्यार्थ्यांनी जपला रक्तदानाचा धर्म, प्राचार्य रवींद्र कोकरे यांचे सहकार्य.
संगमेश्वर:- रक्तदान श्रेष्ठ दान आहे असे म्हटले जाते. गरजू रुग्णांना रक्तदान करून त्यांचे प्राण वाचवणे हा माणूस माणुसकीचा धर्म मानला जातो. संगमेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी रक्तदान करून माणुसकीचा धर्म जपला आहे. नवनिर्माण महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संगमेश्वर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र कोकरे यांनी आणि शिक्षक जाधव यांनी रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले.
आयटीआय संगमेश्वर येथील 18 विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देत रक्तदान केले तसेच शिक्षक जाधव यांनीही रक्तदान केले. नवनिर्माण महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्राचार्य डॉ संजना चव्हाण आणि नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रज्ञा कदम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.