वाटुळ येथील दीड वर्ष रखडलेल्या सर्व्हीस रोडच्या कामाला येणार वेग!

0
60

आमदार किरण सामंतांनी अधिकाऱ्यांना दिल्या आठ दिवसात काम सुरू करण्याच्या सूचना; सकाळी नऊ वाजताच किरण सामंत ऑन फिल्ड; सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यां सहित कंपनीचे अधिकारी यांची उपस्थिती.

राजापूर:- लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार यांनी या भागामध्ये विकासाच्या कामाचा धडाका लावला असून गेली पंधरा वर्षे विकासापासून वंचित असणाऱ्या कामाबाबत किरण सामंत यांनी आढावा घेण्याचे कामाला सुरुवात केली असून काल सकाळीच नऊ वाजता त्यांनी वाटुळ येथे गेले दीड वर्ष प्रलंबित असणाऱ्या सर्व्हीस रोड च्या कामाला भेट दिली.वाटुळ येथे प्रलंबित असणाऱ्या सर्व्हीस रोड चे काम गेले दीड वर्ष रखडले होते. देवरुख – साखरपा मार्गावरुन येणाऱ्या वाहनाना चुकीच्या मार्गाने मुख्य रस्त्यावर यावे लागत होते.

मात्र प्रवासी व ग्रामस्थांची अडचण लक्षात घेता सार्वजनिक बांधकामच्या अधिकारी आणि कंपनीचे ठेकेदारांना बोलून किरण सामंत यांनी काल सकाळीच नऊ वाजता भेट देत आठ दिवसात काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेली दीड वर्ष प्रलंबित असणाऱ्या कामाला आता गती मिळणार असून तात्काळ काम सुरू होणार असल्याचेही किरण सामंत यांनी सांगितले आहे. किरण सामंत लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये ऍक्षन मोडवर आले असून सकाळी नऊ वाजता ऑन फिल्ड त्यांनी कामाला सुरुवात केली .त्यांनी सकाळी वाटुळ येथे बायपासच्या कामाला भेट दिली .

आमदार किरण सामंत आणि अधिकाऱ्यांनी वाटुळ येथील कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व तात्काळ काम सुरू करा अश्या सुचना आमदार किरण सामंत यांनी देताच अधिकाऱ्यांनी आठ दिवसात काम सुरू करू असा आश्वासन आमदार किरण सामंत यांना दिले आहे. येथील जनतेचे प्रश्न लक्षात घेता किरण सामंत यांनी मतदारसंघात पाऊल टाकताच कामाला सुरुवात केली आहे त्यांच्या कामाची पद्धत अधिकाऱ्यांना माहीत असून आता लांजा राजापूर साखरपा मतदारसंघात परिवर्तनाची लाट किरण सामंत यांच्या माध्यमातून येईल अशी आशा येथील मतदारांना वाटु लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here