रत्नागिरी:- कोंकण रेल्वे मधे लोको पायलट तसेच आगवे गावचे सुपुत्र विलास जाधव यांचे आज पहाटे (दि. 29 नोव्हेंबर) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. चिपळूण तालुक्यातील आगवे गावातील सावर्डे रेल्वे स्टेशन वरील सफाई कामगार ते कोंकण रेल्वेत लोको पायलट हा त्यांचा प्रवास खडतर आणि प्रेरणादायी असा आहे.
मागील काही वर्षे विलास जाधव हे फिटनेस कोच म्हणून काम करत होते. रत्नागिरी शहराजनिक कुवारबाव येथे राहत होते व तेथेच वेलनेस कोचचे काम….वजन कमी कसे करावे यावर ऑनलाईन मार्गदर्शन करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे.