दापोली:- शहरातील दापोली शिक्षण संस्था संचलित ए.जी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १४ वर्षे मुली, १४ वर्षे मुले व १९ वर्षीय मुली या वयोगटात विद्यालयाच्या तिन्ही संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
सदरच्या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथील एन.के.वराडकर हायस्कूल मुरुड येथे संपन्न झाल्या. वरील तिन्ही संघांची निवड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच १७ वर्षीय मुले कबड्डी यामध्ये तृतीय क्रमांक तर १९ वर्षीय मुले कबड्डी द्वितीय क्रमांक सुद्धा प्राप्त केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक अर्जुन घुले, प्रदीप शिगवण, अमित वाखंडे, योगेश खोत, संगीता कांबळे,शिवम् भांबुरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचे शालेय समिती चेअरमन रविंद्र कालेकर, मुख्याध्यापक एस. एम.कांबळे, उपमुख्याध्यापक डी.एम. खटावकर,पर्यवेक्षक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष कौतुक केले आहे.