लातुर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सीनियर तायक्वांडो स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर.

0
57

पनवेल (प्रतिनिधी ):- रायगड तायक्वांडो असोसिअशन हि रायगड जिल्ह्याची अधिकृत संघटना आहे, या संघटनेला तायक्वांडो असो. ऑफ महाराष्ट्र ( मुंबई ), तायक्वांडो फेडेरेशन ऑफ इंडिया, व भारतीय ऑलिम्पिक संघाची मान्यता आहे, या अधिकृत संघटनेमार्फत रायगड तायक्वांडो असोसिअशन चे प्रमुख क्षिक्षक व आंतरराष्ट्रीय पंच श्री सुभाष गोकुळ पाटील यांनी खालील रायगडचा संघ जाहीर केला.

मुले :- विनायक शिर्के , ओमकार अंकुश भगत , स्मित निलेश पाटील , दिनेश अनिल म्हात्रे , आर्य विनोद घाग , आयीस्कांत परिजा, वेदांत दरेकर, संघ प्रशिक्षक :- तेजस माळी
व्यवस्थापक :- सोनु वडगिर, मुली :- गायत्री भंडारे , सेजल काणेकर , रातिक आहुजा , कार्तिका नारायण , जानवी पाटील , निर्मिती दत्ता, संघ प्रशिक्षिका :- प्राजक्ता अंकोलेकर
व्यवस्थापक :- निलेश जाधव, पुमसे खेळाडु :- दिनेश म्हात्रे , रुपेश माळी, प्रशांत घरत , राकेश जाधव , प्राजक्ता अंकोलेकर , अक्षता भगत , कार्तिकी नारायण, गायत्री भंडारे , मुग्धा भोसले, संदीप प्रभु, पूमसे प्रक्षिक्षक :- अनिल मधुकर म्हात्रे.

या स्पर्धेमध्ये स्पर्धा प्रमुख म्हणुन सुभाष पाटील ( आंतरराष्ट्रीय पंच ), राष्ट्रीय पंच – रेणुका केसला हिची पंच म्हणुन निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा २८ ते ३० सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल सभागृव्ह औसा रोड लातुर येथे सीनियर स्पर्धा होणार आहे. या राज्यस्तरीय सीनियर तायक्वांडो स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेते खेळाडू, भारतातील शिखर संस्था तायक्वांडो ऑफ फेडेरेशन इंडिया च्या वतीने १७ ते २० ऑक्टोबर २०२४ रोजी राजीव गांधी इनडोअर स्टेडियम इंदिरा गांधी स्पोर्ट्स काम्प्लेक्स पाँडिचेरी येथे होणार्‍या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील व या राष्ट्रीय ताईकवांडो स्पर्धेतील संघ भारतीय ऑलिम्पिक मार्फत उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धे साठी निवडले जाणार आहेत अशी माहिती ७ वी डिग्री ब्लैक बेल्ट सुभाष पाटील यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here