स्मशानभुमी वरील पत्रे कधी खाली पडण्याच्या स्थितीत.
बामणोली (चिपळूण):- चिपळूण तालुक्यातील बामणोली गावची स्मशानभूमीची अवस्था पाहता अतिशय बिकट स्वरूपाची दिसून येत आहे. या स्मशानभूमीचे पत्रे खराब झाले असून काही पत्रे कधी पडू शकतात अशा अवस्थेत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीत प्रेत घेऊन जाणाऱ्या लोकांच्या कधी जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
बामणोली गावासाठी असणारी स्मशानभुमीची उभारणी काही वर्षांपूर्वी करताना पत्र्याची शेड बांधण्यात आली. यामध्ये प्रेत जाळण्यासाठी दोन लोखंडी स्टँड बांधण्यात आले आहेत. गाव मोठा असल्याने याची नितांत गरज होती. मात्र सद्यस्थितीमध्ये या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. दोन पाकी टाकण्यात आलेले पत्रे सडले असून काही पत्रे केव्हाही खाली पडू शकतात अशा अवस्थेत आहेत. पावसात यामध्ये पत्रे खराब झाल्याने पाणी सुध्दा येते.
स्मशानभुमीच्या बाजूला गवत वाढले आहे. दुरवस्था झालेल्या स्मशानभूमी कडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन तिची दुरुस्ती केली पाहिजे. एक अद्यावत स्मशानभूमी व्हावी जेणे करून शेवटचा प्रवास सुखरुप व्हावा. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता झाला तर प्रेत जाळण्यासाठी लाकडे नेणे पावसाळ्यात सोयीचे होईल. गावच्या विकासातील हे एक महत्वाचे काम असून ते मार्गी लागावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.