रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीतच ठेवावे!

0
57

डॉ. समीर जोशी यांची पालकमंत्री उदय सामंत यांना विनंती.

रत्नागिरी:- रत्नागिरी मधील प्रसिद्ध डॉक्टर व सामाजिक कार्यात राहून प्रसिद्धी च्या झोतात न राहणारे डॉक्टर समीर जोशी यांनी स्थलांतरित होणाऱ्या रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालयाला विरोध दर्शवला आहे. राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रादेशिक मनोरुग्णालय तसेच ठेवून तिथे आणखीन त्याचे आधुनिकरण कसे होईल याकडे लक्ष द्यावे अशी विनंती डॉक्टर समीर जोशी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना केलेली आहे.

कोल्हापूर येथील उदगाव मध्ये होणाऱ्या प्रादेशिक मनोरुग्णालयामुळे रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय बंद केले जाणार अशी सध्या चर्चा जोरात आहे. यासंदर्भात डॉक्टर समीर जोशी सारख्या वैद्यकीय क्षेत्रात गेली 40 वर्ष कार्यरत असणारे आणि ज्याच्या पिढ्यानपिढ्या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे जेव्हा डॉक्टर याबाबत आपले मत व्यक्त करतात त्याचा विचार गांभीर्याने विचार करण्याची खरंच गरज आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी, हे रत्नागिरी मधून स्थलांतरित होणार का?

२०२४ मधील ऑगस्ट महिन्यात प्रादेशिक मनोरुग्णालयातील इमारतीचे बळकटीकरण भूमिपूजन सोहळा पालकमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन झाल्याची बातमी वाचनात आली होती. आणि त्यानंतर अचानक विविध वर्तमानपत्रातून तसेच सोशल मिडीयामधून रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालय जयसिंगपूर उदगाव येथे स्थलांतरित होण्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या. वास्तविक पाहता रत्नागिरी येथील मनोरुग्णालयाची स्थापना १८८६ साली झाली. सुमारे १३८ वर्ष जुने असलेल्या व ब्रिटिश काळापासून सुरु असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अचानकपणे स्थलांतर करण्यात येत आहे अश्या दोन्ही परस्परविरोधी बातम्यांमुळे माझ्यासारख्या अनेक रत्नागिरीकरांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

रत्नागिरी,सिंधुदुर्ग, कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांसाठी हे प्रादेशिक मनोरुग्णालय असून सुमारे ३६५ खाटांचे असलेले हे मनोरुग्णालय कोकणातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील आणि जिल्ह्यातील मनोरुग्णांसाठी आधारस्तंभ ठरले असताना नुकत्याच जाहीर झालेल्या शासकीय परिपत्रकामध्ये प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथील आकृतीबंधानुसार मंजूर असलेली पदे जयसिंगपूर उदगाव येथे नव्याने सुरू होत असलेल्या ३६५ खाटांच्या प्रादेशिक मनोरुग्णालयासाठी वर्ग करण्यास शासनाने परवानगी दिली असल्याचे समजते.

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सरकार वेगवेगळे उपक्रम राबवत असताना व मानसिक आरोग्याला प्राधान्य देत असताना अशा प्रकारे येथील प्रादेशिक मनोरुग्णालय स्थलांतरित करत आहेत हे आश्चर्यचकित करणारे आहे. ठाणे तसेच पुणे येथेही मनोरुग्णालय असून तिथे सुमारे १८०० ते २००० खाटा मंजूर असून रत्नागिरी येथे सुमारे३६५ खाटा मंजूर आहेत.

रत्नागिरी येथील मनोरुग्णालय स्थलांतरित न करता रत्नागिरी, पुणे व ठाणे येथील असलेला अतिरिक्त कार्यभार कमी करून उदगाव सारख्या ठिकाणी एखादे नवे मनोरुग्णालय स्थापन केल्यास तेथील मनोरुग्णालयावरील भार कमी होईल व रुग्णांना चांगली सेवा उपलब्ध होईल. रत्नागिरी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे मानसोपचार (Pshychiatry Dept) विभागांतर्गत पुढील काळामध्ये मनोरुग्णाना उपचार दिले जातील आणि त्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थलांतरित करत आहेत असे समजते.

ठाणे व पुणे येथे सुद्धा वैद्यकीय महाविद्यालय असताना तेथे स्वतंत्रपणे प्रादेशिक मनोरुग्णालय चालवले जाते मग ब्रिटिश कालीन वारसा असलेल्या रत्नागिरीतील मनोरुग्णालयाबद्दल हा दुजाभाव का?

रत्नागिरीतील या मनोरुग्णालयामध्ये साधारणपणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ ते ३० टक्के रुग्ण भरती होत असतात निव्वळ सांगली कोल्हापूर, सातारा येथील रुग्णांना येथे येऊन भरती करणे त्रासदायक असल्याने व तेथील जनतेची मागणी असल्यामुळे हे मनोरुग्णालय उदगाव येथे स्थलांतरित होत आहे असे कळते. यापुढे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील मनोरुग्णाला दीर्घमुदतीसाठी जर भरती करायची असेल तर प्रादेशिक मनोरुग्णालय जयसिंगपूर उदगाव येथे स्थलांतरित केल्यामुळे तेथे जावे लागेल हा येथील रुग्णांवर एक प्रकारे अन्यायच आहे. व रुग्णांना ते त्रासदायकही आहे.

उद्योगमंत्री श्री. उदय सामंत हे नेहेमीच कोकणाच्या हितासाठी धाडसी व धडाडीचे निर्णय घेत असतात. त्यामुळे त्यांनी सुद्धा तसेच प्रशासने सुद्धा या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथून न हलवता उदगाव येथे नवीन मनोरुग्णालय स्थापन करण्यात यावे. ह्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती डॉक्टर जोशी यांच्यासह अनेक डॉक्टर्स व सामान्य रत्नागिरीकर जनतेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here