दापोली:- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (DBSKKV) येथील कृषिभूमीकन्या ‘ गटाद्वारे जलकुंड उभारणीबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करत जलकुंडाचे महत्त्व अधोरेखित केले.
जलकुंड उभारणीचे प्रात्यक्षिक रमेश तळवटकर यांच्या शेतामध्ये घेण्यात आले. या प्रात्यक्षिकासाठी इंजि. प्रा. डॉ. सचिन पाठक आणि श्वेतंबरी नगरकर यांनी कृषिकन्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कृषिकन्यांनी जलकुंडामध्ये पाणी साठवण केल्यास पिकांना वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच जलकुंडामध्ये मत्स्यपालन केल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल, असे सांगितले.
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, डॉ. आनंद मयेकर, डॉ. जगदीश कदम, डॉ. प्रवीण झगडे यांचे मार्गदर्शन कृषिकन्यांना लाभले.