मिहीर महाजन यांच्या नेतृत्वाचे आमदार योगेश कदम यांच्याकडून भरभरून कौतुक!
दापोली:- दिनांक १४ आणि १५ ऑक्टोबरला दापोलीत सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र शासन आणि कृष्णामामा महाजन प्रतिष्ठान यांच्या माध्यमाने दिवसभर स्पर्धा आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन संयोजक मिहीर महाजन यांच्याकडून करण्यात आले होते. पहिल्या दिवशी मंदार परळीकर यांचा शिवचरीत्रावर भव्यदिव्य कार्यक्रम सादर करण्यात आला. तर दुसऱ्या दिवशी विदुशी मंजुषा पाटील यांचा अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या साथीने गाण्याचा कार्यक्रम दणक्यात पार पडला. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती कोकणचे सुपुत्र अभिनेते ओंकार भोजने यांनी लावली. दापोलीकरांनी दिवसभर होणाऱ्या स्पर्धांना आणि रात्रीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमासाठी दापोलीचे लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम, पद्मश्री दादा इदाते, विधानपरिषद आमदार सौ. उमाताई खापरे, कृष्णामामा महाजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष खेडचे माजी नगराध्यक्ष बिपिनदादा पाटणे अशा विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली.
सर्व मान्यवरांनी असा कार्यक्रम दापोलीत पहिल्यांदाच झाला असे सांगितले. तसेच आमदार योगेशदादा कदम यांनी मिहीर महाजन यांनी दापोलीत आणलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक करून कायम मदत करण्याचे आश्वासन दिले. पद्मश्री दादा इदाते यांनी सुद्धा प्रतिष्ठानचे काम लोकांसमोर विस्तृत मांडले. आमदार उमाताई खापरे यांनी सुद्धा युवा टीमचे कौतुक करून कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या खालुबाजा, नाट्यछटा, भजन आणि लोककला ह्या स्पर्धांना प्रथम क्रमांकासाठी प्रत्येकी १०००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७००० रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५००० रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले तर चित्रकला, फोटोग्राफी, रिल्स, रांगोळी या स्पर्धेसाठी प्रत्येकी प्रथम क्रमांकासाठी ३००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २००० रुपये, तृतीय क्रमांकासाठी १५०० रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले.