गावखडी येथील वीज पुरवठा खंडीत झाल्याबाबत भाजपतर्फे महावितरणला निवेदन.

0
52

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथील कुंभारवाडी, पड्यारवाडी, नानकरवाडी, पवारवाडी, गुरववाडी परिसरात गेले सात ते आठ दिवस वीज पुरवठा खंडीत झाला असल्याने ग्रामस्थांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याकारणाने पिण्याच्या पाण्याचीही गैरसोय होत आहे. सदर अडचणीबाबत भारतीय जनता पार्टी तर्फे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला.

याप्रसंगी भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपा उत्तर तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, दक्षिण तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, दक्षिण तालुका उपाध्यक्ष राजेश पाथरे, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते पपण लिंगायत, गिरीश कुलापकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here