देवगड:- महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मा. श्री. एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” या योजनेची स्थापना केली आहे. या योजनेअंतर्गंत विविध कंपन्या, आस्थापना, शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था/कार्यालये, इ. मध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उमेदवार दहावी अथवा बारावी उत्तीर्ण असल्यास रू. 6000/- विद्यावेतन, उमेदवार औ.प्र.संस्था अथवा पदविका प्रशिक्षण उत्तीर्ण असल्यास रू. 8000/- विद्यावेतन, उमेदवार पदवीधर अथवा पदव्युत्तर उत्तीर्ण असल्यास रू. 10000/- विद्यावेतन महाराष्ट्र शासनाकडून मिळणार असल्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड या संस्थेमध्ये दि. 25.09.2024 रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील मेळाव्यासाठी देवगड तालुक्यातील श्री. सुनिल बेबले, पुरवठा शाखा, तहसिल कार्यालय, देवगड, श्री. संजय गोगटे, श्री. मो. गोगटे माध्य. व उच्च माध्य विद्यामंदिर, जामसंडे, श्री. रोहिदास दळवी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, देवगड आगार, श्री. श्रीकांत शिरसाठे, श्री. एस. एच. केळकर कॉलेज, देवगड, श्री. शशांक साठम, श्री. एस. एम. जी. हायस्कूल, देवगड, इ. कंपन्या, आस्थापना यांचे नियोक्ता उपस्थित होत. सदरील मेळाव्यात एकूण 31 उमेदवार उपस्थित असून त्यापैकी . एस. एच. केळकर कॉलेज, देवगड कॉलेजने-12 उमेदवारांना, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, देवगड आगारने-01, श्री. एस. एम. जी. हायस्कूल, देवगड कॉलजने-01, खरेदी विक्री संघ, देवगड-01 असे 15 उमेदवारांना मेळावा दरम्याने नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच पुरवठा शाखा, तहसिल कार्यालय, देवगडसाठी-05 उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज सादर करून घेण्यात आले आहे. मा. श्री. एस. एल. कुसगांवकर, प्राचार्य, औ.प्र.संस्था, देवगड सदरील कार्यक्रमास उपस्थित सर्व आस्थापना, कंपन्या, शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था/कार्यालये व संस्थेतील कर्मचा-यांचे आभार, तसेच उमेदवारांना नियुक्ती पत्र मिळाल्याने शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मेळाव्याची सांगता केली.