प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली अंतर्गंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड येथे “Roof Top Solar Technician” परीक्षा संपन्न.

0
59

देवगड:- भारत सरकारने देशभरात प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनेस दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी मान्यता दिलेली आहे. या योजनेचा उद्देश जास्तीत जास्त लोकांनी घराच्या छतावरील सोलर ऊर्जेच्या स्त्रोताचा उपयोग करून जास्तीत जास्त वीज निर्मिती करणे हा आहे. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सोलर टेक्निशियन्सच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. छतावरील सोलर पॅनल उभारणे व त्याच्या देखभालीसाठी तसेच या व्यवस्थेसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. देशभरातून एक लाख कुशल सोलर टेक्निशियन निर्माण करण्याचे लक्ष्य भारत सरकारकडून देण्यात आलेले आहे.

नॅशनल इन्स्ट्रक्शनल मिडीया इन्स्टिट्यूट (NIMI Chennai) यांना ट्रेनिंग पार्टनर म्हणून मान्यता देण्यात आली आहे. नॅशनल इन्स्ट्रक्शनल मिडीया इन्स्टिट्यूट (NIMI Chennai) यांचेकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या किंवा सध्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या इलेक्ट्रिशियन, वायनमन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक व इलेक्ट्रिशियन पावर डिस्ट्रिब्यूशन या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांना 07 दिवसाचे “Roof Top Solar Technician” प्रशिक्षण आयोजित करण्यास कळविले होते.

त्याअनुषंगाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड या संस्थेतील वीजतंत्री व्यवसायाचे श्री. मुनेश्वर झाळू ठाकरे, शिल्पनिदेशक वीजतंत्री यांजकडून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण झालेल्या किंवा सध्या शेवटच्या वर्षाला शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे 07 दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून प्रशिक्षण घेण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थ्यापैकी 18 प्रशिक्षणार्थ्यांची “Roof Top Solar Technician” बाबतची परीक्षा दि. 26.09.2024 रोजी संपन्न झाली. परीक्षेवेळी संस्थेचे प्राचार्य श्री. एस. एल. कुसगांवकर, श्री. एस. एस. भिडे, पर्यवेक्षक, श्री. व्ही. व्ही. सामंत, नोडल ऑफिसर व संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here