कुणबी समाजाच्या शिष्टमंडळाने सादर केलेल्या पुराव्याला यश, पाठपुराव्यामुळे साकारात्मात निर्णय – आमदार डॉ.राजन साळवी.
मुंबई:- जानेवारी २०२३ मध्ये रत्नागिरी जिल्हयामध्ये मागस वर्गीय आयोगाच्या झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षांनी तिल्लोरी कुणबी असा उल्लेख असलेल्या पुरावाधारक बांधवांना ओबीसी देण्यात येउ नये असे तोंडी आदेश दिल्यामुळे तिल्लोरी कुणबी बांधवांना ओबीसी दाखले देणे बंद करण्यात आले होते. त्यावेळी तिल्लोरी कुणबी बांधवांच्या जातीचा दाखला मिळणेसाठी निर्माण होणा-या त्रुटींचे निवारण करणेसाठी समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी येथे आमदार डॉ. राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थिती जातपडताळणी समितीचे अध्यक्ष सौ. पडियार व उपायुक्त श्री.प्रमोद जाधव व सचिव तसेच कुणबी समाजाचे शिष्ट मंडळ यांचे समवेत बैठक घेतली होती.
तसेच अर्थसंकल्पीयविधानस अधिवेशन मध्ये आमदार डॉ. राजन साळवी, भास्कर जाधव, वैभव नाईक यांनी सदर केलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने मागासवर्ग मंत्री मा. नाम.अतुल सावे यांनी आयोगाकडून आहवाल मागविण्यात येईल असे आश्वासित केले होते. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग सदस्य व समाज बांधव यांची जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे संयुक्त बैठक आयोजीत करण्यात आली होती व तत्पूर्वी याबाबत आमदार डॉ. राजन साळवी यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्य प्रा.गोविंद काळे व डॉ.श्रीमती निलिमा सरप (लाखाटे) यांची भेट घेऊन तिल्लोरी कुणबी दाखल्याच्या संबधी विधानसभेमध्ये मांडलेल्या लक्षवेधी संबंधी सकारात्मक चर्चा केली होती.
महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोग सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीनुसार कुणबी समाजाचे शिष्ट मंडळ यांनी तिल्लोरी कुणबी विषयी जमा केलेल्या पुराव्यासह तिल्लोरी कुणबी दाखल्याच्या संबधी विधानसभेमध्ये मांडलेल्या चर्चेच्या अनुषंगाने अहवाल तयार करून सदर अहवाल महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग समितीकडे यांच्याकडे सदर करण्यात आला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांनी शासनास अहवाल क्रमांक-५८ सादर करुन, त्याद्वारे “तिलोरी कुणबी”, “तिल्लोरी कुणबी”, “ति. कुणबी” या पोटजातींचा महाराष्ट्र शासनाच्या “इतर मागासवर्ग” यादीतील अ.क्र.८३ येथे कुणबी, पोट जाती लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्यापुढे तिलोरी कुणबी, तिल्लोरी कुणबी, ति. कुणबी या जातीचा समावेश करण्याबाबत शिफारस केली होती.
त्यानुषंगाने मा. मंत्रीमंडळाने सदर शिफारस मान्य केली असून शासन निर्णय क्रमांकः आयोग-२०२४/प्र.क्र.२३२/मावक दिनांक २४ सप्टेंबर,२०२४ नुसार आयोगाच्या शिफारसीनुसार “तिलोरी कुणबी”, “तिल्लोरी कुणबी”, “ति. कुणबी” या पोटजातींचा महाराष्ट्र शासनाच्या “इतर मागासवर्ग” यादीतील अ.क्र.८३ येथे कुणबी, पोट जाती लेवा कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, मराठा कुणबी, कुणबी मराठा यांच्यापुढे तिलोरी कुणबी, तिल्लोरी ति. कुणबी या पोटजातीचा समावेश करण्यात आला आहे.
कुणबी समाजाचे शिष्ट मंडळाने सादर केलेल्या पुराव्या यश मिळाले असून लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे साकारात्मात निर्णय झाला असून कुणबी बांधवाना दिलासा मिळाला आहे.