शिरगाव-गांजूरडा परिसरात भाकड गायी-गुरांचा ‘रास्ता रोको’!
शिरगाव (रत्नागिरी):- गेले अनेक दिवस रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर भाकड जनावरे, खास करून गायी व गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने शहरात वाहतुकीस अडथळा होत आहेत तसेच आपघातांची शक्यता देखील वाढली आहे. अशात शहरा नजीकच्या शिरगाव ग्रामपंचायत हद्दीत देखील हीच समस्या पाहायला मिळत आहे. शिरगाव परिसरात रस्त्यावर या भाकड गायी व गुरं यांचा वावर होत असल्याने वाहतुकीस अडथळा पाहायला मिळत आहे. यावर ग्रामपंचायत व प्रशासन काही पाऊले उचलणार आहे का? असा प्रश्न नागरिकांकडून व वाहक – प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.