दापोली:- दापोली तालुक्यातील देवके येथील दत्तवाडी येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ, कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रम (रावे) अंतर्गत कार्यरत असलेल्या ” कृषी अक्ष” “आमची माती आमची माणसं” व “कृषी निष्ठा” या गटा अंतर्गत ग्रामस्थांना पशुसंवर्धन व मृदाशास्त्र विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग विषयतज्ञ मा. डॉ. नरेंद्र प्रसादे, मृदाशास्त्र विभाग मा. डॉ. प्रफुल्ल अहिरे ,कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण झगडे तसेच निर्मल ग्रूप ग्रामपंचायत सरपंच मा.श्री.दिनेश आडविलकर, गाव अध्यक्ष मा. श्री. संजय गोरीवले, गावचे सचिव मा. श्री. नरेश बैकर, दत्तवाडी अध्यक्ष मा.श्री.उदय बैकर, बौध्दवाडी अध्यक्ष मा.श्री.रोहन धोत्रे, माजी पोलिस पाटील मा.श्री.राजाराम देवकेकर,पोलिस पाटील सौ. मानसी बैकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्नेहा बैकर, ज्येष्ठ नागरिक श्री. लक्ष्मण बैकर, महिला प्रतिनिधी सौ. सुगंधा पोसकर व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात गावकऱ्यांच्या मागणी नुसार निराळ्या अश्या कुकुट्टपालन या विषयावर विषय विशेषज्ञ डॉ. नरेंद्र प्रसादे यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. यात कोंबड्यांची निगा, त्यांच्या गरजा, रोगांवर नियंत्रण व याकडे व्यावसायिक दृष्या पाहून कसे उत्पन्न वाढवावे यासंबंधी चर्चा झाली. त्यानंतर विषय विशेषज्ञ डॉ. प्रफुल्ल अहिरे यांनी पारंपरिक शेतीचे महत्व, रासायनिक खतांचे दुष्परिणाम व शेणखतांचे महत्व सांगितले. यानंतर गावकऱ्यांचे प्रश्नांचे निरसन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सर्व विद्यापीठातील मान्यवरांचे तसेच कृषी अक्ष व कृषी निष्ठा या रावे मधील सर्व विद्यार्थिनींचे गावचे सचिव मा.श्री.नरेश बैकर यांनी गावच्या वतीने आभार मानले.सर्व कृषीकण्यानी कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. प्रवीण झगडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.समृद्धी भोर हिने केले. अशा रीतीने कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला.