‘महाविकास आघाडीने कायमच शिवरायांचा अपमान करण्याची भूमिका घेतली!’

0
32
Dr Hrishikesh Kelkar speaks at protest against Mahavikas Aghadi in Chiplun.
चिपळूण येथील महाविकास आघाडी विरोधातील आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर.

भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांचे प्रतिपादन.

चिपळूण:- भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी व दक्षिण रत्नागिरी जिल्हा यांनी संयुक्त पणे चिपळूण येथील अश्वारुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेबद्दल सर्वं पदाधिकारी कार्यकर्ते यांनी महाराजांच्याची माफी मागितली. शिवभक्त म्हणून आमच्यासाठी सुद्धा ही गोष्ट दुःखद आहे. परंतु महाविकास आघाडी राजकोट किल्ल्यावर झालेल्या प्रकाराचं आणि महाराजांचे निव्वळ राजकारण करीत आहे याकरिता महाविकासआघाडीचा निषेध व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीने कायमच शिवरायांचा अपमान करण्याची भूमिका घेतली असल्याचे आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत असताना भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी सांगितले.

यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दक्षिण ऋषिकेश केळकर, उपाध्यक्ष अभिषेक शिंदे, सरचिटणीस स्वप्नील गोठणकर, उत्तर रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अतुल गोंदकर. चिपळूण तालुकाध्यक्ष समीर पवार. गुहागर चे संगम मोरे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा युवा मोर्चा संयोजक अविनाश गुरव,युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी सरचिटणीस मंदार कदम, युवा मोर्चा कार्यकर्ते,वेद सुर्वे,अंकुश चौधरी, साहिल भिसे,राज खंडझोडे, यश खंडजोडे, शहरमंडळ अध्यक्ष श्रीराम शिंदे, उपाध्यक्ष महेश कांबळी,सरचिटणीस सारिका भावे, चिटणीस प्रणाली सावर्डेकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा शीतल रानडे, प्रसिद्धी प्रमुख अमृता जोशी, अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्ष अमित चिपळूणकर, सरचिटणीस अभिजित सावर्डेकर, महिला मोर्चा उत्तर रत्नागिरी सरचिटणीस श्रद्धा कदम, बेटी बचाव बेटी पढाव शहराध्यक्षा साधना कात्रे, अभय चितळे, सुनील जांभेकर, निखिल किल्लेकर, आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here