भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी प्रचार मोहिमा.
रत्नागिरी:- संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात भाजपयुवा मोर्चा डॉ. ऋषिकेश केळकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री. उदय सामंत, राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे श्री. किरण सामंत व चिपळूण – संगमेश्वर मतदारसंघाचे उमेदवार श्री. शेखर निकम यांच्या प्रचारासाठी युवा मोर्चा प्रदेश सचिव विक्रम जैन, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर, जिल्हा सरचिटणीस स्वप्निल गोठणकर, उपाध्यक्ष अभिषेक शिंदे, श्रेयस सावंत देसाई, अभय शेवडे तसेच जिल्ह्यातील युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख देखील सक्रिय होते.
युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत संपूर्ण जिल्हा पिंजून काढला, त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांनी भाजयुमो पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. विशेष करून राजापूर-लांजा- साखरपा मतदारसंघाच्या अगदी दुर्गम भागात देखील किरण तथा भैय्या शेठ सामंत यांच्या विजया साठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावत भाजपचे प्रतिनिधी म्हणून भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी प्रचार व नियोजन केले. निवडणूक काळात तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी एकूण २५+ कार्यक्रम/बैठक घेतले.
भाजप युवा मोर्चाच्या या मेहनतीची दखल कोकणचे नेते मंत्री रविंद्र चव्हाण तसेच रत्नागिरी दक्षिण मधील विजयी उमेदवार मंत्री उदय सामंत, किरण सामंत व शेखर निकम आदींनी घेतली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महायुतीचे कोकणातील प्रमुख समन्वयक म्हणून भूमिका बजावणारे, रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चाचे आधारस्तंभ अनिकेत पटवर्धन यांच्या सहकार्याने युवा मोर्चा ही जबाबदारी पार पडू शकला असे डॉ. ऋषिकेश केळकर यांनी सांगितले.