ओम साई मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम; दर महिन्यातून एकदा भरवणार आरोग्य तपासणी शिबीर!

0
58

रविवार दि. २४ रोजी झाले उद्घाटन..

रत्नागिरी:- जनसेवेचा वसा हाती घेऊन गेली ३० वर्षे त्या दृष्टीने विविध जनहितार्थ सामाजिक उपक्रम रावविणारे मंडळ म्हणून सुप्रसिद्ध असलेले ओम साई मित्र मंडळ, नाचणे – साळवी स्टॉप लिंक रोड माध्यमिक शिक्षक पतपेढी समोर, रत्नागिरी यांनी ” आपली माणसं ” या संकल्पनेतुन आरोग्य तपासणी शिबिराचे काल रविवार दि. २४ / ११ / २०२४ रोजी रत्नागिरी मधील सुप्रसिद्ध डॉ. विराज आठल्ये तसेच जेष्ठ डॉ. दिलीप पाखरे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी येथे जनसेवा बजावणारे मंडळाचे डॉ. ऋत्विक शेंडगे व वेदांग भट हे उपस्थित होते. तसेच मंडळाचे पराग सावंत, अमोल सावंत , गौरांग आगाशे, साईराज मयेकर, आनंद भट, हर्ष सावंत, अभिजित गिरकर, मिलिंद जोशी, शार्दूल मोरे, मंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे इत्यादी उपस्थित होते. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून दर महिन्याला भरविण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिराचा अनेक लोकांना लाभ होणार असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात असून मंडळाला अनेकांकडून शुभेच्छा देण्यात येते आहेत. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हे आरोग्य तपासणी शिबीर भरविण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ओम साई मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here