रत्नागिरी:- इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणजेच ईद-ए-मिलाद येत्या 16 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे . ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) चे औचित्य साधून फैजाने अत्तार कोकण नगर येथे लहान मुलांच्या रॅलीचे (जुलूस)आयोजन करण्यात आले होते, ही रॅली कोकण नगर परिसरात काढण्यात आली होती. यावेळी रॅलीमध्ये लहान मुले तसेच संस्थेचे सदस्य अल्ताफ कुरेशी, फारूक जरीवाला अकिल मेमन,उवेज जरीवाला,अली असगर अत्तारी,उपस्थित होते तसेच तसेच पोलीस टीम सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त भव्य जुलूस (रॅली) काढण्यात येणार आहे तरी रत्नागिरी मधील सर्व मुस्लिम बांधवांनी ठीक सकाळी 8:30वाजता कोकण नगर फैजाने अत्तार येथे उपस्थित रहावे.