दापोली:- गृहरक्षक दल स्थापना दिनाच्या निमित्ताने दापोलीमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. या होमगार्डच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दापोलीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली आणि वृक्ष संवर्धन व भूमी वाचवण्याबाबत संदेश देण्यात आला. ०६ डिसेंबर १९४६ रोजी गृहरक्षक दलाची स्थापना करण्यात आली होती. दापोलीमध्ये हा दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुका समादेशक राजेश राजवाडकर व होमगार्डचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते