संपूर्ण रत्नागिरी जिल्हा व कोकण विभागात समाजोपयोगी कामांचा धडाका सुरूच; संपूर्ण कोकणात 25 लाख मोफत वह्या वाटप.
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा चांदेराई,हरचेरी विभागातील जि.प.प्राथमिक शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व संस्थेची व उपक्रमांची माहिती देण्यात आली. जिजाऊ सदस्य श्री चंद्रशेखर महाकाळ,पोमेंडी सरपंच सौ. ममता जोशी यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष एड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार अर्चना अनंत नैकर, जिजाऊ सदस्य शुभम गोताड, साहिल रेवाळे, मुख्याध्यापक व सहकारी, शिक्षक-शिक्षिका,विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.