शहापूर (ठाणे):- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचालित श्री भगवान महादेव सांबरे – क्रिस्टल केअर रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील समाज बांधवांसाठी मोफत आरोग्यसेवा पुरवणारे हे रुग्णालय ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील आसनगाव येथे उभारण्यात आलेल्या या रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहावे, असे आवाहन जिजाऊ संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
उदघाटन निरा आर्केड, मुंबई नाशिक हायवे, आसनगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथे पार पडणार असून अधिक माहितीसाठी नितेश लोखंडे – 8108686782 यांना संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.