रत्नागिरी:- कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने सर्व शिक्षकांनी शिक्षक दिनी ‘अन्याय दिन’ म्हणून आंदोलन पुकारले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पूर्वी दिलेल्या इशारा पत्रानुसार या वर्षीच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.
या आंदोलनाचा भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेकडून बाबतचे निवेदन रत्नागिरीचे तहसीलदार श्री.म्हात्रे यांना दिले. यावेळी जिल्हा सचिव प्रा. दिलीप जाधव, अध्यक्ष प्रा. बी .आर .पाटील, प्रा. नंदकुमार जाधव, प्रा. चारुदत्त पड्यार, प्रा. शिल्पा देसाई, प्रा. मनस्वी लांजेकर, प्रा. सागर पोकळे, प्रा. सुमेध मोहिते उपस्थित होते.