रत्नागिरी:- डंपरला ओव्हरटेक करताना स्पिड ब्रेकरवर दुचाकीचा तोल जाऊन झालेल्या अपघातात दाम्पत्य गंभीर जखमी झाले. अपघाताची ही घटना शनिवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. सुमारास कारवांचीवाडी येथे घडली. शनिवारी सकाळी अमोल अनंत विश्वासराव (वय ३८) पत्नी अदिती अमोल विश्वासराव (३५, दोन्ही रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी) ही दुचाकीवरून रत्नागिरीच्या दिशेने येत होते.
ते घरापासून काही अंतरावर आले असता पुढील डंपरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना स्पीड ब्रेकरवर त्यांचा दुचाकीवरील तोल गेल्याने दोघेही रस्त्यावर फेकली गेली. यात डंपरचे चाक पत्नी अदितीच्या पायावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. अमोल विश्वासराव यांना किरकोळ दुखापत झाली. दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.