गुरुवारी सकाळ पासूनच महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी:- अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या उत्सवासाठी (Ganeshotsav) चाकरमानी कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत. मुबंई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) कमालीची वाहतूक कोंडी होत आहे. गुरुवारी सकाळ पासूनच महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. महामार्गवरील धामणी पेट्रोल पंपापासून थेट संगमेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव स्वतः रस्त्यावर उतरले होते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्ग गणेश भक्तांच्या वाहनांमुळे फुलून गेला आहे. हजारो वाहने रस्स्रत्यावर आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक हैराण झाले असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी स्थानिक पोलीस मदत करीत आहेत.