कंत्राटी शिक्षकांच्या आंदोलनाला मोठे यश!

0
57
बेरोजगार D.ed, B.ed धारकांकडून शासन निर्णयाचे स्वागत.
प्रातिनिधिक छायाचित्र.

बेरोजगार D.ed, B.ed धारकांकडून शासन निर्णयाचे स्वागत…

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्यामुळे मागील शैक्षणिक वर्षात कंत्राटी तत्वावर काम केलेल्या शिक्षकांनी १५ ऑगस्ट पासून आठ दिवस शिक्षण सेवक नियुक्ती साठी आंदोलन केले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेत कंत्राटी तत्वावर शिक्षक नियुक्ती करण्याचा शासन निर्णय घेतला आहे या शासन निर्णयचे रत्नागिरी जिल्ह्यातील D. ed, B. ed धारकांकडून स्वागत करण्यात येत आहे..

रत्नागिरी जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत चाललेले स्थलांतर या मुळे जिल्हा परिषद शाळेचे पट दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत पट संख्येच्या निकषनुसार बऱ्याच शाळा एक शिक्षिकी झाल्या आहेत. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत होते.

आत्ताच्या शैक्षणिक निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बेरोजगारी देखील कमी होण्यास मदत होईल आणि मुलांचे शैक्षणिक नुकसानही टळणार आहे. कमी पटाच्या शाळांना नवीन कंत्राटी शिक्षण सेवक मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत तसेच शिक्षण मंत्री ना. दिपक केसरकर . यांचे D. ed, B. ed बेरोजगार संघटनेच्या वतीने धन्यवाद व्यक्त केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here