लेखन:- बाबा ढोल्ये रत्नागिरी ✍🏾
मी गणेशभक्त आहे. हे तुम्हांला माहिती नाही पण श्री गणेशांना आहे. घरोघरी गणपती प्रतिष्ठापना हाच गणेश सोहळा होता. गेल्या चार दशकात सारेच बदलले.कित्येक धार्मिक सणांना इतकेच काय जातीनिहाय मानल्या गेलेल्या आपआपल्या नेत्यांच्या जयंत्या,पुण्यतीथ्याही सार्वजनिक झाल्या.यात काही वावगे झाले नाही. पूर्वी मुंबईत गल्ली,वाडी,वस्तीत एक मवाली वावरत असायचा. तुम्हाला प्रश्न पडला असेल यांना निश्चित काय म्हणायचंय……… मला यातील सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल बोलायचयं……..तेपण लालबागच्या राजाविषयी बोलायचयं…….
लालबागचा राजा ही शान आहे. वरदान आहे. मनोकामना पूर्ण करणारा आहे.तो भरभरून देतो.हे खरे आहे.यात दुमत असण्याचे कारण नाही.माझ्या मनात तर यत्किंचितही नाही.मी लांबून गणेशांना नमस्कार करतो.मुद्दा काय तर ‘लालबागचा राजा’ कुणाचा ? हा प्रश्न मागील दहा वर्षात भेडसावतो.धनिक,श्रीमंत,रंगरंगोटी करुन चेहरा सजविल्यांचे की उघड्या अंगाने येणाऱ्या ‘नटव्यांचे’ ? खरंतरं बघाल तिथे देव आहे.गणपती हे आराध्य दैवत आहे. चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून श्री गणेश अधिराज्य गाजवतात.अगम्य,अतर्क्य महिमा गणेशांचा आहे…….
लालबागचा राजाला धनिकांनी वेठीला धरला आहे.एकेकाळी गरीब मजूर कामगारांचा आधार असलेल्या या गणेशांना तेथील गरीब,वृद्ध गणेश भक्तांना अक्षरशः बेपर्वा,मानहानीकारक,वर्तन मिळत आहे.तासनतास रांगेत राहून बाप्पांच्या दर्शनासाठी व्याकूळ असलेल्या भक्त पायावर लिन होणार तोच दांडगाईने त्याला बाहेरचा मार्ग दाखवला जातो……. मिजासखोरी देवाच्या प्रांगणात चांगली नाही. व्यवस्थापन कमिटी काय केवळ दुर्गा उपटायला आहे काय ? माणसात भेदाभेद करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? आयुष्यात गणेशाची भक्ती माहिती नसलेल्या साल्या बिनआंघोळीच्या कुजकटांना ‘म्हणे सेलिब्रेटी म्हणून तिथे रेंगाळत राहायला कितीही वेळ हा उफराटा न्याय इथे का ? बुद्धीची आणि सोवळ्याची देवता गणेश आहेत.त्यालाच इथे पूर्णविराम दिला जातो…….
उद्योगपतींची निगराणी नट – नट्यांची ती वेंडोळी करणारी ‘स्वयंसेवक’ म्हणविणारेंना त्यांच्या घरात माता भगिंनी आहेत ना ? जी वागणूक ते देवाच्या समोर इतर माता भगिंनी वृद्धांना देतात तेच वर्तन आपल्या घरी करतात का ? प्रश्न खूप आहेत अधिक नको या सर्वांनी ही माणसांची अभूतपूर्व गर्दी जमते ती गणराजेंच्या असलेल्या अपार श्रद्धेपोटी जमते. हे लक्षात घ्यायला हवे ! भक्तांना ही कळत नाही देव भावाला भुकेला आहे धांगडधिग्याला नाही व्यवस्थापन बघायचं असेल तर महाराष्ट्रातील शेगाव संतगजानन महाराजांचे मंदिर बघा.जिथे प्रतीदिनी पाच लाख भाविक येतात ते काशी बघा……हावरस असलेल्या भक्तांनो श्रद्धा जपा. देव चराचरात आहे. सृष्टीनिर्मात्याला मनाने हात जोडा अशा लाचार करणाऱ्या स्वयंसेवक व्यवस्थापनापासून दूर रहा…..शेवटी देव सर्वव्याप्त आहे….श्रद्धेला सुरुंग लावताय त्यातील भलेमोठे पाषाण न झेपणारे असते हे लक्षात ठेवा …… जय गणेश सर्वांना चांगली बुद्धी दे ……