लांजा:- संस्कृती व परंपरा जतन करणे तसेच युवकांच्या सुप्त गुणांना वाव देऊन सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने क्रीडा युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व नेहरू युवाकेंद्र,रत्नागिरी तसेच राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘युवा महोत्सवाचे’ आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले होते. या महोत्सवात सांस्कृतिक प्रकारात समुह लोकनृत्य स्पर्धेत बॅ. नाथ पै विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हर्चे विद्यालयाला प्रथम क्रमांक व विदुर अनंत निवळकर(१२वी) याने विज्ञान युवा कृती (हस्तकला) स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.