संगमेश्वर:- भाजप महिला मोर्चा, संगमेश्वर दक्षिण यांच्या तर्फे नवदुर्गा दर्शन प्रवासाचे आयोजन केले होते. दैनंदिन जीवनात घरकामात मदत करणाऱ्या ताईंना नेहमीच्या दिनचर्ये मधून स्वतः साठी वेळ मिळावा तसेच खास नवरात्रीमध्ये महिलांना रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ देवींचे दर्शन घडावे, ह्या संकल्पनेतून सौ. स्नेहा ताई फाटक, भाजपा संगमेश्वर दक्षिण मंडळ, महिला अध्यक्षा यांनी नियोजन केले. सदर प्रवास हा ६ ऑक्टोबर २०२४ रोजी देवरुख बस आगारातून मार्गस्थ होऊन मुचरी तेरये वाघजाई, शृंगारपूर – भैरी भवानी, भातगाव, – जुगाई, सोमजाई मंदिर, गुहागर – दुर्गा देवी, चिपळूण – करंजेशवरी, कळकवणे – राम वरदायिनी, पोफळी – महालक्ष्मी, तुरंब – शारदा देवी, टेरव – भवानी या रत्नागिरीतील नवदुर्गा दर्शन नियोजीले होते. या प्रवासात महिलांना सकाळ संध्याकाळचा अल्पोपहार तसेच रात्रीचे जेवण आदी सोयी करण्यात आली होती.
सदर नवदुर्गा दर्शन प्रवासामुळे महिलांशी चर्चेतून संघटना वाढवता येईल आशा महिला मोर्चा मंडळध्यक्षा सौ. स्नेहा ताई फाटक यांनी व्यक्त केली. या सुप्त कार्यक्रमातून नारीशक्ती चा जागर दिसून आला. भाजपा महिला मोर्चा, रत्नागिरी दक्षिणच्या, सौ. शिल्पा ताई मराठे, प्रदेश सचिव आणि सौ. वर्षा ताई ढेकणे जिल्हाध्यक्षा, यांनी या सुंदर उपक्रमास सौ. स्नेहा ताई फाटक यांना प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिल्या. प्रवासाच्या नियोजनामध्ये “चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख” श्री प्रमोदजी आधटराव, तालुकाध्यक्ष श्री रुपेश कदम, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ स्नेहा फाटक, श्री राहुल फाटक,श्री शंकर मालप , श्री संतोष जोशी, श्री आनंद सारदळ, श्री दत्ता नार्वेकर, सौ संगीता जाधव, सौ शितल पंडित, सौ स्वाती गोडे , सौ.समृद्धी वेलवणकर सौ श्रेया मोहिते, सौ सुजाता भागवत, सौ रूपाली कदम, सौ सिद्धी साठे, आदी पदाधिकाऱ्यांनी योगदान देऊन मोलाची भूमिका बजावली.