प्रा. विनोद महाबळे यांना कॅलिग्राफर, ग्राफिक डिझायनर आणि ट्रेनर म्हणून २५ वर्षाहून अधिकचा अनुभव!
रत्नागिरी:- प्रा. विनोद महाबळे यांचा विद्यार्थी केंद्रित दृष्टीकोन आणि त्यांची प्रशिक्षण देण्याची पद्धत यामुळे त्यांनी अनेक नामांकित संस्थांमध्ये कॅलिग्राफिचे प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केले आहे. अनुभवसंपन्न व प्रतीथयश कलाकार असणाऱ्या प्रा. विनोद महाबळे यांचे मंथनच्या मंचावर ‘कॅलिग्राफी’ विषयावर अनमोल मार्गदर्शन होणार आहे.
ही कार्यशाळा शनिवार दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ०३ या वेळेत मंथन आर्ट स्कूल रत्नागिरी, बंदररोड या ठिकाणी आयोजित केली आहे. या कार्यशाळेसाठी इंटरमिजिएट ड्राॅईंग ग्रेड परिक्षा विद्यार्थी, १० वी, १२ वी, ग्राफिक डिझाईनर, आर्ट स्कूलचे विद्यार्थी, डि.टी.पी. ओपरेटर, पदवीधर, हौशी कलाकार इ. सर्व सहभागी होऊ शकतात.
सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी 9527008676 या क्रमांकावर संपर्क करा.