वाशिम:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) येत्या २६ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येणार असून बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या नगारा वास्तूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली आहे.
यावेळी त्यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित राहणार असून त्याअनुषंगाने वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी नगारा भवनाची पाहणी केली आहे.