निसर्ग रक्षक निलेश बापट यांचे निधन!

0
33

चिपळूण:- चिपळूणमधील ग्लोबल टुरिझमचे संचालक, निसर्ग रक्षक, मानद वन्यजीव रक्षक (वनविभाग) निलेश विलास बापट यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज शनिवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दु:खद निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

निसर्गाशी एकरूप झालेले व्यक्तिमत्त्व अशी निलेश बापट यांची ओळख होती. शहरातील चिंचनाका परिसरात त्यांचा गणपती कारखाना आहे. फटाक्यांचे होलसेल व्यापारी म्हणूनही ते शहरात प्रसिध्द होते. निसर्गावर प्रेम करणारा, निसर्ग संवर्धनासाठी झटणाऱ्या निलेश बापट यांच्या कार्याची दखल घेत वनविभागाने त्यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती केली. ते धाडसी व उत्तम ट्रेकर्स होते. नवोदित ट्रेकर्सना ते कायम प्रोत्साहन देत असत. उद्या रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अकाली निधनाने निसर्ग रक्षक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here