रत्नागिरी:- जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी प्रमोद खांडेकर सेवानिवृत्त झाले, यानिमित्ताने पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी छोटेखानी समारंभाचे आयोजन शिक्षक सतीश महाडिक आणि मित्र मंडळी यांच्या वतीने अक्षरा क्लासेस, आठवडा बाजार येथे करण्यात आले होते. प्रमोद खांडेकर यांनी शासकीय अधिकारी म्हणून ३० वर्ष प्रामाणिक सेवा करून जिल्हाधिकारी कार्यालयात कामकरण्याच्या पद्धतीचा वेगळा ठसा उमटवून आपल्या कुशल चे कसब दाखवल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांचे लाडके साहेब म्हणून त्यांची ख्याती झाली.
नम्र, मनमिळाऊ, हुशार आणि शांत, प्रत्येकाला मदत व सहकार्य करणारे म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असणारे श्री खांडेकर यांना अहंकार कधीही शिवला नाही. लहान थोरांचा मान सन्मान देवून आपल्या समोरील प्रत्येक व्यक्तीला आदर सन्मानाने हाकमारुन आपुलकीने विचारपूस करणे हा त्यांचा स्वभाव. म्हणूनच या समारंभात यांच्याप्रति उपस्थित सर्वांनी आपले मतप्रदर्शीत करून गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री खांडेकर व सौ. पल्लवी खांडेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे निकटवर्तीय संतोष जाधव, सौ. मीनाक्षी जाधव, पत्रकार संजय ( शिवा ) पाटणकर, शिक्षक सतीश महाडीक, सौ. सृष्टी महाडीक, समाजसेविका सौ. रुचिता बोरकर, प्रशांत अडीवरेकर, सौ. प्राची अडीवरेकर, ओंकार पाटणकर तसेच अक्षरा महाडीक, अर्णव महाडीक, आराध्या बोरकर, आराध्य अडीवरेकर, सोहम अडीवरेकर, निलम जाधव इत्यादी उपस्थित होते..