प्रियांका गांधींनी घेतली अमित शाह यांची भेट!

0
14

नवी दिल्ली:- वायनाडच्या खासदार प्रियंका गांधींनी (Priyanka Gandhi Congress) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. केरळच्या वायनाड मतदारसंघातील मोठा भाग पुरामुळे विस्कळीत झाला आहे, काही लोकांचा यात जीवही गेला. यासंदर्भात ही भेट झाली. भेटीदरम्यान प्रियंका गांधींनी अमित शाह यांच्याकडे वायनाडसाठी २२२१ कोटी रुपयांचा मदत निधी देण्याची मागणी केली. अमित शाह आणि प्रियंका गांधींमध्ये झालेल्या बैठकीत या दोन नेत्यांसह आणखी २१ खासदार उपस्थित होते.

याबाबत बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आम्ही पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे. वायनाडला पुरामुळे मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार जर मदत करू शकत नसेल तर संपूर्ण देशात खूप चुकीचा संदेश जातो. पंतप्रधानांनी वायनाडमधील पीडितांची भेट घेतली. त्यानंतर मी देखील पीडितांची भेट घेतली, त्यांना सरकारकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, वायनाडमध्ये (Waynad) झालेल्या घटनेला आता ४ महिने उलटून गेले मात्र कोणताही दिलासा मिळाला नाही.याबाबत मी गृहमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली आहे. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन पीडित लोकांच्या वेदना ओळखल्या पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

महिलांच्या ‘जय श्रीराम’ ला प्रियंका गांधींचा ‘जय सियाराम!’

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी त्यांच्या तडकाफडकी स्वभावासाठी ओळखल्या जातात. बुधवारी, प्रियंका गांधी लोकसभेतून बाहेर पडताना त्यांच्या स्वभावाचा पुन्हा प्रत्यय आला. त्यांनी काही महिलांची संसदेच्या आवारात भेट घेतली. प्रियांका गांधी यांना पाहताच या महिलांनी ‘जय श्रीराम’ म्हटले. प्रत्युत्तरात गांधी यांनी ‘जय सियाराम’ म्हटले. महिलांनी महिलांचा आदर केला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here