जि.प. सुयोग विकास विद्यामंदिर कशेळी नं.५ शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा!

0
23

राजापूर:- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. २ स्पर्धेचा राजापूर तालुकास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये शासकीय गटात जि.प. सुयोग विकास विद्यामंदिर करोळी नं. ५ ता . राजापूर जि.रत्नागिरी या शाळेने व्दितीय क्रमांक पटकावला असून शाळा २ लाख रूपये बक्षिसाची मानकरी ठरली आहे.

शाळेच्या या यशामध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री अनिकेत यादव व सरव सदस्य शिक्षक पालक संघ माता पालक संघ, सर्व पालक व सर्व ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा आहे. शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी व शासनाचे विविध उपक्रम योजना अंमलबजावणीबाबत अतिशय जागरूक व तत्पर असणा-या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ, मुग्धा दाते , शिक्षक श्री.सुनिल जायदे, तंत्रस्नेही शिक्षक श्री. मिलिंद नार्वेकर विषय शिक्षिका सौ. मानसी घाणेकर या सर्वांच्या प्रयत्नातून शाळा करोळी नं. ५ ने हे मानाचे पारितोषिक प्राप्त केले आहे.

शाळेच्या या कामगिरीबद्‌द‌ल परिसरातील अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ यांचेकडून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here