Ratnagiri BJP: सा. बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील रिक्षा व्यवसायिकांसाठी स्वच्छतागृह व्हावे!

0
30

भाजपाच्या वतीने करण्यात आली मागणी.

रत्नागिरी:- दि. ९ ऑक्टोंबर २०२४ रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशन सुशोभिकरणाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा व्यवसायिक यांनी स्वच्छता गृह आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रविद्रजी चव्हाण साहेब यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. मा. मंत्री महोदयांनी याबाबत तात्काळ सूचना केल्या आहेत तरी या सूचनांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ व्हावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी केली आहे.

स्वच्छतागृहाची व्यवस्था झाल्यास रिक्षा व्यावसायिक यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, तालुकाध्यक्ष दादा दळी, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप नाचणकर, उमेश देसाई, संकेत कदम, संतोष बोरकर, निलेश आखाडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here