रत्नागिरी:- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र (विभाग रत्नागिरी) तर्फे गुरुवार दि.12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरतडे, कातळवाडी येथे मोफत वह्या वाटप तसेच संस्थेची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर, बंटी महाकाल, शुभम गोताड, साहिल रेवाले, मुख्याध्यापक – हरिश्चंद्र साळवी, राज फुटक, पालक प्रतीक्षा भातडे, शर्मिला फुटक, शाळा व्यास्थापन समिती सौ. सायली फुटक, सोनाली गोताड, अनुष्का भातडे व सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.