रत्नागिरी:- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र (विभाग रत्नागिरी) संस्थेच्या माध्यमातूनलोकनेते शामरावजी पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय रत्नागिरी आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या अंतर्गत अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना Aptitude टेस्ट व रेल्वे आणि बँकिंग साठी लागणारे गणित व बुद्धिमत्ता,व स्पर्धा परीक्षा, SSC/RBI/RRB,PSU यांचे खास शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराला ८३ विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.
त्यासाठी प्रसिद्ध गणिततज्ञ श्री खेमचंद्र पाटील सर यांचे विशेष सत्र महाविद्यालयात सुरू आहे या अंतर्गत मुलांना अभियांत्रिकीची पदवी झाल्याबरोबर शासकीय नोकरीत जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिजाऊचे हे प्रयत्न सुरू आहेत.

