मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य.
रत्नागिरी:- रत्नागिरी शहर भाजपातर्फे विविध कार्यक्रमांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त ग्राममदैवत श्री देव भैरी मंदिरामध्ये मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, भाजपाचे शहराध्यक्ष राजन फाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने, बावा नाचणकर, अशोक वाडेकर, मंदार मयेकर, मंदार खंडकर, सोनाली आंबेरकर, संजीव बने, नितीन गांगण, गुरुप्रसाद फाटक, नितीन जाधव, अमित विलणकर, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, माजी नगरसेविका सुप्रिया रसाळ, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, संपदा तळेकर, प्राजक्ता रुमडे, सचिन गांधी, रामा शेलटकर, श्री. बाष्टे, तुषार देसाई, शैलेश बेर्डे, मंदार भोळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष भाई जठार आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर दुपारी सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयामध्ये शालेय गणवेश वाटप करण्यात आले. त्यावेळी बाळ माने यांच्यासह राजन फाळके, मुख्याध्यापक श्री. चव्हाण व सर्व विद्यार्थी, शिक्षक, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे गणवेश वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजन फाळके, मंदार खंडकर, मंदार मयेकर, नीलेश आखाडे, नितीन गांगण, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पाटील, सर्व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
आंब्याचे कलम लावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आवाहन केल्याप्रमाणे एक झाड आईच्या नावाने या उपक्रमाअंतर्गत शहराध्यक्ष राजन फाळके यांच्या हस्ते आंब्याचे कलम शिवाजी हायस्कूल येथे लावण्यात आले.