संगमेश्वर:- भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष श्री. राजेशजी सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार सदस्य नोंदणी अभियानाची बैठक आज संगमेश्वर उत्तर मंडळामध्ये संपन्न झाली. यावेळी नावडी आणि कसबा जि. प. गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची एकत्रिक बैठक घेण्यात आली.
पुढच्या स्थानिक पातळीवरील निवडणुका लक्षात घेता या मध्ये सदस्य नोंदणी अभियानाबरोबरच बूथ अध्यक्ष आणि आणि बूथ बांधणी विषयी चर्चा करण्यात आली.
25 डिसेंबर हा दिवस माजी पंतप्रधान अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे अवचित्य साधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
संगम ज्येष्ठ नागरिक संघ संगमेश्वर चे अध्यक्ष/ माजी राज्यपारिषद सदस्य आणि भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. प्रमोद काका शेट्ये, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. माधवीताई भिडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते श्री.हरिभाई पटेल यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संगमेश्वर उत्तरचे तालुका अध्यक्ष श्री. विनोद म्हस्के, जिल्हा सरचिटणीस श्री. अमित केतकर, जिल्हा चिटणीस श्री. राकेश जाधव, तालुका सरचिटणीस श्री. सतीश पटेल, उपाध्यक्ष श्री. राजेश आंबेकर, माजी जि. प. सदस्या सौ. दीपिका जोशी, रत्नागिरी शहर सरचिटणीस श्री. मंदार खंडकर, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. स्वनिल सुर्वे, महिला मोर्चा तालुका सरचिटणीस सौ. मुग्धा भिडे, सौ. प्रियंका साळवी, श्री. मंगेश साळवी, श्री. प्रसाद भिडे, साहिल मोहिते, सौ. खंडकर मॅडम, श्रीधर आंबेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.