रत्नागिरी:- राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा -2 हे अभियान राबविण्यात आले. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान’ टप्पा -2 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातून श्रमिक विद्यालय आणि लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे ने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबद्दल सर्वच ठिकाणी विद्यानगरीचे कौतुक होत आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हा एक अनोखा उपक्रम आहे, जो महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण मिळावे म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान राबविण्यास मान्यता देण्यात आली.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची यशस्वी पूर्तता जाहीर केली, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान २९ जुलै ते १५ सप्टेंबर २०२४ पर्यंतच्या कालावधीत राबविण्यात आले. या उपक्रमात राज्यातील विविध शाळांनी विविध गटात सहभाग घेतला. खासकरून, खाजगी गटात श्रमिक विद्यालय आणि लोकनेते शामरावजी पेजे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे यांनी रत्नागिरी तालुक्यात दुसरा क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.
या पारितोषिकाचे वितरण रत्नागिरी जिल्हा परिषद लोकनेते शामरावजी पेजे सभागृह या ठिकाणी दिनांक ५ डिसेंबर 2024 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री कीर्तीकुमार पुजारा यांच्या हस्ते करण्यात आले , यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सावंत मॅडम, BDO श्री जाधव सर, गट शिक्षणाधिकारी श्रीमती प्रेरणा शिंदे मॅडम, प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री कासार सर, विस्तार अधिकारी श्री. मुरकुटे सर, पावस बीट प्रमुख मोहिते मॅडम, केंद्रप्रमुख श्रीमती शिंदे मॅडम, श्रमिक किसान सेवा समिती रत्नागिरीचे अध्यक्ष श्री नंदकुमारजी मोहिते साहेब तसेच विविध संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी सत्कार सोहळ्यासाठी या विचार मंचावर उपस्थित होते. शिवार आंबेरे विद्यानगरीचे सर्व स्तरातून एक उपक्रमशील शाळा म्हणून अभिनंदन करण्यात येत आहे.
हे यश संपादन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री मधुकर थुळ सर यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचे नियोजनात्मक दृष्टीने नेतृत्व केले, उत्तम नेतृत्वकार कसे असावेत याचे उदाहरण म्हणजेच श्री मधुकर थुळ सर. सरांनी सांघिक भावना जोपासून सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये एकीचे बीज पेरले आणि एक वेगळा आदर्श निर्माण केला. या सांघिक विजयाचे शिल्पकार विद्यानगरीचे सहाय्यक शिक्षक श्री तरळ सर, बाबाडे सर, चांदले मॅडम, आंबेकर सर, कुड मॅडम, मांडवकर सर, गिरकर सर, वाळिंबे मॅडम, तेंडुलकर मॅडम, भडेकर मॅडम, कांबळे सर, वळवी सर, कुळे सर, चव्हाण मॅडम, राजस मोहिते सर, शिंदे मॅडम, अक्षता मॅडम शिक्षकेतर कर्मचारी प्रभाकर भाऊ कांबळे इत्यादी ठरले आहेत.
सामाजिक राजकीय सांस्कृतिक ऐतिहासिक शैक्षणिक अशा विविध स्तरांवरील उच्च विचार संपन्न व्यक्तिमत्त्वांच्या वैचारिक प्रगल्भतेचा लाभ इथल्या शिक्षण संकुलातील प्रत्येक घटकाला लाभला आहे. हे अतिमूल्य यश सर्वांचे प्रेरणास्थान असलेले या विद्यानगरीचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमारजी मोहिते यांचे आहे. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे देखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य लाभले आहे या सर्वांचे संस्थेचे हितचिंतक दशक्रोशीतील सर्व ग्रामस्थ पालक यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत या यशाबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.