फिजिओथेरेपी महाविद्यालय रत्नागिरीतील शैक्षणिक क्षेत्राला नवा आयाम देणारे : डीन डॉ. जयप्रकाश रामानंद.

0
15
रत्नागिरी:- एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी रत्नागिरीच्या स्टुडन्ट ओरिएंटेशन प्रोग्रॅमप्रसंगी बोलताना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद. शेजारी फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. मुकेश बाबू, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम, चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, सीजिओथेरपी कॉलेजच्या संचालिका ऋतुजा हेगशेट्ये, नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये. 

एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी रत्नागिरीचा स्टुडन्ट ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात.

रत्नागिरी:- फिजिओथेरेपी, नर्सिंग, मेडिकल ही एकमेकांना जोडली गेलेली क्षेत्र आहेत. त्यामुळे हे एक सांघिक काम आहे. रत्नागिरीत सुरू झालेले एस. ए. जोशी फिजिओथेरेपी महाविद्यालय शैक्षणिक क्षेत्राला नवा आयाम देणारे आहे. या बद्दल नवनिर्माण संस्थेचे विशेष आभार. या महाविद्यालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

स्टुडन्ट ओरिएंटेशन प्रोग्रॅमचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना चेअरमन अभिजीत हेगशेट्ये. शेजारी मान्यवर.

नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी रत्नागिरी या महाविद्यालयाचा आज स्टुडन्ट ओरिएंटेशन प्रोग्रॅम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत अभिजीत हेगशेट्ये, संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या संचालिका ऋतुजा हेगशेट्ये, प्राचार्य डॉ. मुकेश बाबू, डॉ. अनघा शेळके-शिंदे, डॅा. आर्या कुंटे शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार गीते उपस्थित होते.

डॉ. रामानंद म्हणाले, फिजिओथेरपीच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रातील केवळ तांत्रिक ज्ञान घेण्याबरोबरच इतर कौशल्यही आत्मसात केली पाहिजेत. आजच्या स्पर्धेच्या जगात ताणतणाव वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्राला मोठी मागणी आहे. त्यामुळे नर्सिंग, मेडिकल, फिजिओथेरपी यांच्याकडे मॉडर्न मेडिसिनचा भाग म्हणून पाहिले जाते. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. रघुनाथ माशेलकर रत्नागिरीत आले होते. त्यांनी रत्नागिरी ही कॅलिफोर्निया पेक्षाही सुंदर असल्याचे विधान केले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा डीन म्हणून गेले वर्ष-दीड वर्ष मी रत्नागिरीत आहे आणि डॉ. माशेलकर यांचे म्हणणे खरे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. आपणही रत्नागिरीसारख्या शांत, निसर्गसंपन्न शहरात राहून ती फिजिओथेरपीचे शिक्षण पूर्ण करणार आहात त्याबद्दल शुभेच्छा, अशा शब्दात डॉ. रामानंद यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

एस एम जोशी कॉलेज ऑफ फिजिएथेरेपी रत्नागिरीच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसमवेत मान्यवर.

चेअरमन श्री. हेगशेट्ये म्हणाले, रत्नागिरी हा खरंतर निसर्ग संपन्न असलेला दुर्गम भाग; पण आज काळ बदललाय. धकाधकीच्या जीवनापासून काही काळ लांब जात लोकं निसर्गाच्या सानिध्यात येत आहे. निसर्गाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच रत्नागिरीचे महत्त्व वाढले आहे. मेडिकल कॉलेजमुळे ते आणखीन वाढले. फिजिओथेरपी चालविणे हे खूप मोठे काम आहे. ‘नवनिर्माण’ने ते धाडस करून हा अभ्यासक्रम इथल्या ग्रामीण भागातल्या मुला-मुलींसाठी उपलब्ध करून दिला. फिजीओथेरपी ही उद्याच्या काळातली महत्त्वाची गरज आहे. आज मागणीच्या मानाने फिजिओथेरपीस्टची संख्या कमी आहे. त्यामुळे मेहनतीच्या जोरावर हा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे.रत्नागिरी जिल्ह्यातील अखेरच्या घटकाला फिजिओथेरपी क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळावी हाच नवनिर्माण चा उद्देश आहे.

“नवनिर्माण”चे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आम्ही करतो ते सर्वोत्तम करतो तिथे कुठलीही तडजोड करत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कौशल्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास ही वाढला पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते. त्यामुळे इथून फिजिओथेरेपीचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या मुला मुलींसाठी रोजगाराच्या पायघड्या घातल्या जातील असा विश्वास श्री. हेगशेट्ये यांनी व्यक्त केला. एस. एम. जोशी फिजिओथेरेपी महाविद्यालयाच्या संचालिका ऋतुजा हेगशेट्ये यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वेदना रहित उत्साही आयुष्य जगायला फिजीओथेरपी मदत करत असल्याचे नमूद करून फिजिओथेरपीचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. “नवनिर्माण हाय” च्या शिक्षिका वैष्णवी चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here