गुहागर तालुका तेली समाजसेवा संघाने www.telijodidar.com हे वेबपोर्टल व Telijodidar ॲप सर्वांसाठी खुले केले आहे.
गुहागर:- विवाहासाठी अनुरूप वधू किंवा वर यांची निवड काळजीचा विषय बनत आहे. शिक्षणामुळे मुले-मुली भवितव्याबद्दल जागरूकपणे विचार करतात. त्यांना भविष्यातील स्वप्नांना साजेसा, आपल्या योग्यतेचा, आवडीनुरूप जोडीदार हवा असतो. साथीदार शोधण्याच्या या प्रयत्नांना घरबसल्या बळ देण्यासाठी गुहागर तालुका तेली समाजसेवा संघाने वेबसाईट सुरू केली आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून भारतच काय, जगभरातील वधू-वरांची माहिती घरबसल्या मिळावी व विवाहयोग्य उमेदवारांस मनपसंत जोडीदार शोधणे सोपे जावे तसेच वधू-वरांचे विवाह कमीत कमी वेळेत व कमी खर्चात होण्यासाठी गुहागर तालुका तेली समाजसेवा संघाने www.telijodidar.com हे विवाहविषयक वेबपोर्टल व Telijodidar ॲप सर्वांसाठी खुले केले आहे. सदर वेबपोर्टल मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. या ठिकाणी उपवर डाटाबेसच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते.