पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 11 जानेवारीला रत्नागिरीत.

0
42

रत्नागिरी:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था एम.आय.डी.सी.मिरजोळे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाळ उपाध्याय मेळाव्याचे 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता, फाटक हायस्कूल, रत्नागिरी आणि श्रीमान वि.स.गागंण कला वाणिज्य आणि कै.त्रि.प.केळकर विज्ञान कनिष्ठ महाविदयाल, सुभाष रोड, गाडीतळ, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे.

मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील खासगी आस्थापना सहभागी होणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. नोंदणी केलल्या उमेदवारांनी त्यांचेकडील युझर आयडी व पासवर्ड चे सहायाने दिनांक 11 जानेवारी रोजीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे दिवशी मुलाखतीकरीता त्यांचे बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.

रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया या कार्यालयाकडे त्वरीत संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. ०२३५२-२२१४७८/२९९३८५ वर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here