रत्नागिरीकरांनो सावधान…! फेसबुकवरील ‘ते’ अकाऊंट जिल्हाधिकाऱ्यांचे नाही!

0
72
रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असणारे फेक फेसबुक अकाऊंट.

रत्नागिरी:- Devendra Singh IAS Ratnagiri Collectorate या नावाने एक बोगस फेसबुक खाते तयार करण्यात आले आहे. ते रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचे नाही. यावरुन आलेली मैत्रिची विनंती कोणीही स्वीकारु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

या बोगस खात्यावर एका महिलेच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला असून, यावर अजिबात विश्वास ठेवू नये. या खात्यावरील कोणत्याही बातमीवर किंवा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये. Collector & District Magistrate-Ratnagiri याच अधिकृत खात्यावरुन शासकीय उपक्रमांची माहिती दिली जाते. अन्य कोणत्याही प्रकारचे संदेश पाठवले जात नाहीत. कृपया, याची फेसबुक वापरकर्त्यांनी, दर्शकांनी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here